संदेश क्रांती न्यूज .
खानापूर प्रतिनिधी
नेरसा ( ता खानापूर ) येथील युवकाने गुरूवारी दि.१३ रोजी रात्री शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना घडली. गळफास घेतलेल्या युवकाचे नाव निलेश हैबतराव देसाई (वय.४२) आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की निलेश देसाई हा शेती बरोबर दुध उत्पादनाचा व्यवसायचा मोठा व्यवसाय करत होता.
गुरूवारी दि.१३ रोजी रात्री जनावरांचे दुध काढुन तो रात्री शेतातील घरात झोपण्यासाठी गेला होता. मात्र रात्री शेतातील झाडाला गळफास लावुन घेतला.शुक्रवारी दि १४ रोजी सकाळी गड्याला निलेशने गळफास लावुन घेतल्याचे दृष्टीस पडले.लागलीच ही बातमी नेरसे गावात पसरली.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यानी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन विचार पूस केली.व कुटूंबाचे सात्वन केले.
लागलीच खानापूर पोलिसाना माहिती मिळताच पोलिसानी पंचनामा करून मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात पाठवुन शवविच्छेदन करून मृतदेह कुटूबाच्या ताब्यात देण्यात आला.
सायंकाळी नेरसे स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
निलेशच्या पश्चात पत्नी मुलगा ,मुलगी, आई
,वडील,भाऊ असा परिवार आहे.